परदेशात जाउन तेथुन मायदेशातील क्रांतीकारकांना मदत करणे व त्यायोगे ब्रिटीशांची सत्ता सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने उलथवून टाकणे, या उद्देशाने स्थापन झालेल्या गदर पार्टीचे एक संस्थापक लाला हरदयाळ यांचे नंतर मतपरिवर्तन झाले. आणि त्यांनी त्यामागच्या वैचारिक प्रवासाची कहाणी "फोर्टी फोर मन्थ्स ईन जर्मनी अॅण्ड टर्की" या पुस्तकात दिलेली आहे. या पुस्तकाची ओळख करुन देणे हा या पोस्टचा उद्देश आहे.
१९०५ मधे शिष्यवृत्तीवर ऑक्सफर्ड मधे शिकायला गेलेल्या लाला हरदयाळ यांनी १९०७ मधे ICS परीक्षेची तयारी सोडून दिली व भारतात परतले, पण इथे आल्यावर त्यांच्या प्रक्षोभक लिखाणामुळे त्यांनी ईंग्रज सरकारचा रोष ओढवून घेतला आणि लि़खाणावर बंदी येईल व तुरुंगात जावे लागेल असे दिसू लागल्याने त्यांनी १९०९ मधे भारत सोडला व ते युरोपात गेले. त्यांनी पॅरिस व अल्जेरियात काही काळ काढला आणि १९११ मधे अमेरिकेस गेले, येथे त्यांचा संबंध अराजकवाद्यांशी आला पण त्यामुळे अमेरिकन सरकारने त्यांच्यावर खटला भरला आणि त्यांना अमेरिका सोडून १९१४ मधे जर्मनीस जावे लागले.
अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी स्थलांतरीत भारतीयांची संघटना स्थापली, जी नंतर "गदर पार्टी" या नावाने ओळखली जाउ लागली, या संघटनेच्या गदर पत्राचे ते संस्थापक संपादक होते. भारतात सशस्त्र लढा उभारुन ईंग्रजांना पळवून लावणे हे मुख्य उद्दीष्ट असल्यामुळे गदर पार्टीमार्फत भारतातील क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रे पाठवली जात असत, कामागाटामारु प्रकरणात या पार्टीने मोठी भुमिका बजावली होती. लाला हरदयाळ १९१४ मधे जर्मनीत पोचल्यानंतर बर्लीन मधील भारतीय क्रांतीकारकांच्या गटात सामील झाले. यासुमारास त्यांचे जर्मनी व तुर्कस्तान मधे अनेक शहरांत वास्तव्य होते. साडेतीन वर्षांच्या या कालावधीत त्यांनी दोन्ही देशांतील अधिकारी व सामान्य नागरिकांशी संवाद साधला, व त्याचा परिणाम म्हणून ब्रिटीश, फ्रेंच व त्यांच्या साम्राज्याविषयीच्या मतामधे आमुलाग्र बदल झाला. हे परिवर्तन कसे झाले व त्याची कारणे त्यांनी "Fourty Four Months In Germany and Turkey" या पुस्तकात दिली आहेत.
पुस्तकाच्या सुरवातीस त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की, भारत व ईजिप्त मधील जनतेच्या भल्यासाठी मी माझे विचार येथे मांडत आहे, हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत, मी कुठल्याही पुस्तकात वा वर्तमानपत्रात छापून आलेली माहिती देत नसून गेल्या साडेतीन वर्षांत माझ्या कानांनी जे ऐकले व डोळ्यांनी जे पाहिले तेच लिहित आहे. आणि या नंतर येतात साडेतीन वर्षांत त्यांनी ऐकलेल्या गोष्टी, घडलेल्या चर्चांतील वाक्ये, त्यांना आलेल्या पत्रांतील मजकूर ईत्यादीं मधून दिसणारा जर्मन व तुर्की समाजाचा आपल्याला परिचित नसलेला चेहरा व त्यामागे असलेले स्वभाव आणि त्यावर लाला हरदयाळ यांचे रोखठोक भाष्य आणि त्यांची ईतर राष्ट्रांतील (प्रामुख्याने फ्रेंच व ब्रिटीश) जनमानसाशी केलेली तुलना, आणि असे करत असतांना त्यांनी फार कठोर शब्दांत टिका केलेली आहे. उदाहरणार्थ "But I found that every German, high and low, rich and poor, suffers from this curious mental derangement". आणि तुर्कांविषयी देखील अशीच रोखठोक भाषा वापरत त्यांनी लिहिलेय; "The Turks could not sing or speculate, as they are really very low in the scale of mental evolution. Nature has not endowed them with brains". त्यांनी जर्मन व तुर्कांवर केलेले असे अनेक प्रहार पुस्तकात पानोपानी आहेत. यासोबत तुर्की खिलाफतीस पाठिंबा देणार्या मुसलमानांना सुनावताना ते म्हणतात, "The Muslims of India and Egypt must realise their own privileged position, and disclaim all connection with Central Asian freebooters", त्यांच्या मते जगभरच्या मुसलमानांनी तुर्कांऐवजी ईंग्रज व फ्रेंचांची मदत घेउन स्वतःचा विकास साधाला पाहिजे.
लाला हरदयाळ पुस्तकात या दोन देशांचे वा समाजांचे एक वेगळे चित्र आपल्याला दाखवतात, ज्याचा उल्लेखदेखील आपल्याकडच्या साहित्यात वा ईतिहासाच्या पुस्तकांत आढळत नाही, त्यामुळे एक वाचक म्हणून आपल्याला जोरदार धक्का बसतो. परंतु कोणा वाचकाला असे वाटणे स्वाभाविक आहे की स्वतःला आलेल्या काहि कटू अनुभवांमुळे चिडून हरदयाळांनी असे लिखाण केले असावे. त्यात तथ्य असुही शकेल परंतु पुस्तकात सुरवातीला दिल्या प्रमाणे महायुद्धाचा लागलेला निकाल व त्याची पुस्तकात सापडणारी कारणे, मित्रराष्ट्रांचे सहकार्य नसणे व व्याप्त प्रदेशातील जनतेची सहानुभुती गमावणे आदि गोष्टींसोबत नंतर काही वर्षांनी ज्या प्रकारे हिटलरने सत्ता काबीज केली व बहुसंख्य जर्मनांचा त्याला मिळालेला पाठिंबा व त्याचे पर्यवसान जर्मनीच्या विनाशात झालेले पाहिले की लाला हरदयाळ सत्य सांगत असुन त्यांच्या द्रष्टेपणाचे कौतुक वाटते. यासोबत पुस्तक वाचल्यानंतर ईतिहासातल्या बर्याच कोडयांचा उलगडा होतो. उदा.
- तीन वर्षे जर्मनीत राहिल्या नंतर सुभाषचंद्र बोस जर्मनी सोडून जपान्यांकडे गेले. याचे कारण त्यांनाही पुस्तकात वर्णिल्याप्रमाणे वागणूक जर्मनांकडून मिळाली असली पाहिजे.
- नाझी पक्षाला जर्मन जनतेकडून अपवाद वगळता विरोध झाला नाहि किंवा नाझीं विरोधात व्यापक जनचळवळही उभी राहीली नाही. याचे कारण हिटलर जर्मनांच्या वांशीक अहंकाराला कुरवाळत असे, म्हणून बहुसंख्य जर्मनांना हिटलरशाही मान्य असावी असे वाटते आणि पुस्तकातले सर्वसामान्य जर्मनांचे वर्णन याला पुष्टी देते.
- सामरिक दृष्ट्या दैदिप्यमान कामगिरी करुनसुद्धा दोन्ही महायुद्धांत जर्मनांना पराभव का पत्करावा लागला? विरोधी देश व स्वतःच्या सामर्थ्या विषयी जर्मनांच्या मनात चुकीची धारणा होती हे दिसुन येते.
- सुसंस्कृत व आधुनिक जर्मनांकडून ज्युंचे हत्याकांड कसे घडले? खरेतर जर्मनांनी स्वतःविषयी वृथा अभिमान व ईतरांप्रती घृणा मनात बाळगल्याचे पुस्तकात दिसून येते, झालेले हत्याकांड हा त्याचाच परिणाम असावा.
या पुस्तकातून आपल्याला शिकण्यासारखे काय आहे.
राष्ट्राची वा समाजाची मानसिकता जर्मन व तुर्कांसारखी नसावी. पुस्तकात जसे जर्मन व तुर्कांचे वर्णन सांगितले गेले आहे तशी स्थिती भारतीयांची होउ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण तत्कालीन जर्मन समाजात दिसणार्या अपप्रवृत्ती आपल्याकडेही आहेत त्यांना रोखले पाहिजे.
पुस्तकाच्या शेवटच्या "निष्कर्ष" या प्रकरणात त्यांनी भारतीयांना सल्ला दिला आहे की; "England is free and great, and we can share in this freedom and greatness as worthy citizens of the greatest State that the world has yet seen". या पुस्तकाला ९० वर्षे होउन गेलीत तरिदेखील त्यातील विचार आजदेखील मननीय व अनुकरणीय आहेत, आणि भारतीयांना जर स्वतःची उन्नती साधायची असेल तर त्यांनी ईंग्रजांचा कित्ता गिरवला पाहिजे यात काहिही संशय नाही.
पुस्तक येथे उपलब्ध आहे.

3 प्रतिक्रिया:
छान माहिती आहे.
माझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://www.prashantredkarsobat.blogspot.com/
खूप छान माहिती अतिशय मार्मिक शब्दांत व्यक्त केली गेली आहे. भारताचा आपला इतिहास प्रत्येक व्यक्तींना माहिती असणे खूप आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी काय केले होते, काय हाल सोसले होते तरीपण त्यांनी आटकेपार झेंडे कसे लावले होते ह्या सर्व बाबींची माहिती फक्त इतिहासामुळेच प्राप्त होऊ शकते.
नमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO
Website : www.learnsubject.in (लवकरच माहिती upload केली जाईल)
प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA
मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk
मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA
आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw
आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0
आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU
तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Information in Marathinice information sir
टिप्पणी पोस्ट करा